Pune Crime News | धमकी देऊन व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोघांवर FIR, येरवडा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -Pune Crime News | आम्हाला हप्त चालू करा असं म्हणून दुकानदाराकडे खंडणीची (Extortion Case) मागणी करणाऱ्या दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) रविवारी (दि.20) रात्री अकराच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे घडला.

राहुल सुभाष कदम Rahul Subhash Kadam (वय -24, रा. कोंढवा पुणे) आणि अक्षय राजेंद्र कांचन Akshay Rajendra Kanchan (वय -25, रा. उरळी कांचन, पुणे ) यांच्यावर आयपीसी 385, 447, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत दुकान मालक शहिबाज सादिक कुरेशी Shahibaz Sadiq Qureshi ( वय – 31, रा. एम.जी. रोड कॅम्प, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानात येऊन पाच हजार रुपयांची मागणी केली.
त्यावेळी कुरेशी यांनी कशाचे पैसे अशी विचारण केली असता, आम्हाला हप्त चालू करा असं म्हणून खंडणीची मागणी केली.
त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता, आरोपींनी दुकानाच्या गल्लयात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला.
तसेच ‘आता तुला मी दाखवतो, तुझ्या दुकानात गोमास ठेवतो अशी तक्रार देऊन पोलीस घेऊन येतो’ अशी धमकी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 30-40 जणांवर FIR, येरवडा परिसरातील प्रकार

Dhananjay Munde | आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे