Pune Crime News | दुचाकीच्या टायरला तब्बल १७ पंक्चर असल्याचे भासवून फसवणूक; वडगाव शेरीमधील प्रकार

पुणे : Pune Crime News | रस्त्यावर खिळे टाकून वाहने पंक्चर करुन लोकांचे नुकसान करुन स्वत:चा धंदा करण्याचा प्रकार रस्त्यावरील पंक्चर विक्रेत्यांनी पूर्वी आरंभलेला होता. आता ट्युबलेस टायरमध्ये अनेक पंक्चर असल्याचे भासवून लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. एका तरुणाला याचा अनुभव आला. त्याची दुचाकी पंक्चर असल्याचे भासवून एका पाठोपाठ १७ पंक्चर काढून त्यांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत सौरभ अरविंदकुमार कौशल (वय ३२, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे नगर रोडलगत आर्मी गेटचे पुढे वडगावश शेरी येथे २४ जुलै रोजी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली. (Pune Crime News)

फिर्यादी हे पत्नीचे वैद्यकीय रिपोर्ट आणण्याकरीता दुचाकीवरुन जात असताना दोघे जण पाठीमागून दुचाकीवरुन आले.
त्यांना तुमची गाडी पंक्चर असल्याचे सांगितले. त्यांनी खाली उतरुन पाहिले तर त्यांना गाडीच्या चाकात हवा कमी असल्याचे जाणवले.
त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या पंक्चर काढणार्‍याकडे गाडी नेली.
त्यांनी एका पाठोपाठ एक पंक्चर असल्याचे भासवत टायरला भोके पाडली.
एकूण १७ पंक्चर काढून त्यांची १ हजार ७०० रुपयांची फसवणूक (Fraud Case) केली.
तसेच गाडीच्या टायरचे नुकसान केले.
पोलिसांनी गुन्हा दखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक आळेकर तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात कारागृह पोलीस हवालदारासह तिघांना अटक