Pune Crime News | मद्य विक्री परवाना नावावर करुन घेत फसवणूक, महिलेची भावाविरोधात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राज्य उत्पादन शुल्क सी विभागाला (State Excise C Department) खोटे सांगून मद्य परवाना स्वत:च्या नावावर करुन घेतला. तसेच खोट्या सह्या करुन मालमत्ता नावावर करुन फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. याप्रकरणी महिलेने भाऊ व भाच्याविरोधात पोलीस ठाण्यात (Pune Police) तक्रार केली आहे. हा प्रकार सन 2013 ते आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत बिबवेवाडी येथे राहणाऱ्या 67 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन महेंद्र मुरलीधर घुले Mahendra Muralidhar Ghule (वय-63), अंगद महेंद्र घुले Angad Mahendra Ghule (वय-36 दोघे रा. सह्याद्री फार्मस, बाणेर) यांच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे भाऊ-बहिण आहेत.
आरोपी महेंद्र घुले याने राज्य उत्पादन शुल्क सी विभागाला आई-वडिलांना आपण एकटाच मुलगा असल्याची खोटी
माहिती दिली. आरोपींनी फिर्य़ादी व त्यांच्या आईच्या खोट्या सह्या करुन यांचा मद्य विक्रीचा परवाना (Liquor License)
स्वत:च्या नावावर करुन घेतला. तसेच खोटे कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन फिर्यादी यांची
कौटुंबिक मालमत्ता आपल्या नावावर करुन घेत फसवणूक (Cheating) केली.
याबाबत फिर्यादी यांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडे (Pune EOW (Economic Offence Wing) तक्रार केली होती. आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग केला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नेवसे (API Swapnil Nevse) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | मुंबई-ठाण्यात 24 घरफोडी, पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच घरफोडीच्या गुन्ह्यात अटक

Disha Patani Gorgeous Look | इवेंटमध्ये दिशा पटानीने वेधलं नेटकऱ्यांच लक्ष, पाहा व्हायरल फोटो…!