Pune Crime News | परस्पर इनोव्हा कार विकून फसवणूक, कात्रजमधील एजंटवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गाडी विकण्याच्या बहाण्याने इनोव्हा कार (Innova Car) घेऊन जाऊन गाडी परस्पर विकून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कात्रजमधील गाडी खरेदी विक्री करणाऱ्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2023 ते आज पर्य़ंत वंडरसिटी, कात्रज येथे घडला आहे. ( Pune Crime News)

याबाबत संकेत संजय यादव (वय-25 रा. सुखसागर नगर, कात्रज, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित पाटील (रा. वंडरसीटी, कात्रज) याच्यावर आयपीसी 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी रोहित पाटील हा गाडी खरेदी व विक्री करणारा एजंट आहे.
फिर्यादी यांना त्यांची इनोव्हा कार (एमएच 12 एचझेड 5176) विकायची होती.
त्यामुळे त्यांनी रोहित याच्याशी संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादी यांची कार विकण्याच्या बहाण्याने कार आणि गाडीचे कागदपत्र घेऊन गेला.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांच्या परस्पर गाडी दुसऱ्याला विकून आर्थिक फसवणूक केली.
आरोपीने गाडी विकून आलेले पैसे तसेच गाडी परत न करता फिर्य़ादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोंढव्यातील व्यक्तीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करुन विनयभंग, खडकी मधील प्रकार