Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची अडीच कोटींची फसवणूक, मुंबईतील बाफना मोटर्सच्या संचालकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चांगला नफा अथवा रक्कमेच्या चौपट जागा देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची 2 कोटी 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईतील बाफना मोटर्स प्रा. लि. (Bafna Motors Pvt. Ltd. Mumbai) च्या संचालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात (Koregaon Park Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत रविंद्र नौपातलाल साकला (रा. ढोले पाटील रोड, पुणे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाफना मोटर्स (मुंबई) प्रा. लि. चे संचालक सुमीतप्रसाद मीश्रीलाल बाफना Sumitprasad Misrilal Bafna (वय-62 रा. मरीन ड्राईव्ह, मुंबई) यांच्याविरुद्ध आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 31 मार्च 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत रविराज रिअ‍ॅलिटी मिलेनियमच्या (Raviraj Reality Millennium) ढोले पाटील रोडवरील कार्यालयात घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्र साकला यांचा रविराज रिअ‍ॅलिटी नावाने बांधकाम व्यवसाय आहे. तर आरोपी बाफना देखील व्यवसायिक आहेत. त्यामुळे फिर्य़ादी आणि आरोपी यांचे संबंध आहेत. मार्च 2021 मध्ये बाफना हे फिर्यादी यांच्या पुण्यातील ढोले पाटील रोडवरील कार्यालयात आले. त्यांनी फिर्यादी यांना कंपनीकरीता व रियल इस्टेटकरिता पैशांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. बाफना यांनी साकला यांना त्यांच्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास सांगितले. पैसे गुतवल्यास चांगला नफा किंवा गुंतवलेल्या रक्कमेच्या चौपट जागा देण्याचे आश्वासन बाफना यांनी दिले. साकला यांनी विश्वास ठेवून बाफना यांच्या कंपनी दोन कोटी 50 लाख रुपये गुंतवले. यानंतर आरोपीने फिर्य़ादी यांना कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नेवसे (API Nevse) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या भावाला नेपाळ बॉर्डरवरून अटक; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम