Pune Crime News | युरोप टूर्स आयोजित करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, कर्वेनगर येथील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | युरोपला फिरायला जाण्याचे स्वप्न कर्वेनगर येथील ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. युरोप टूर्स (Europe Tours) आयोजित करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (Fraud) करण्यात आली. तसेच त्यांच्या जावयाचे व्हिसाचे (Visas) काम करुन देतो असे सांगून त्यांचीही आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार (Pune Crime News) 18 मार्च 2023 ते 30 मे 2023 या कालावधीत कर्वेनगर (Karve Nagar) येथे घडला आहे.

याबाबत गिरीधर दौलतराव खैरनार Giridhar Daulatrao Khairnar (वय-62 रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिलिंद मधुकर जोशी Milind Madhukar Joshi (रा. कृष्ण पिंगाक्ष, शहाजीराजे भोसले नगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 406, 409 419, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

आरोपीने फिर्यादी यांना युरोप टूर्स आयोजित करुन देते असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी युरोप टूर्ससाठी मिलिंद जोशी याला वेळोवेळी ऑनलाईन 4 लाख 62 हजार 600 तसेच रोख 50 हजार रुपये दिले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 5 लाख 12 हजार 600 रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांचे जावई देवेंद्र कुलकर्णी (Devendra Kulkarni) यांना व्हिसाचे काम करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये घेतले.

आरोपी मिलिंद जोशी याने फिर्यादी यांच्याकडून युरोप टुर्ससाठी पैसे घेतले मात्र त्यांना टुर्सवर पाठवले नाही.
फिर्यादी यांनी युरोपला जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे देऊन ही आरोपीने टुर्सचे आयोजन केले नाही.
त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पाठपुरवा केला असता आरोपीने पैसे परत देतो असे सांगितले.
परंतु त्याने फिर्यादी व त्यांच्या जावयाचे पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या