Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात (Maratha Reservation Protest) काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार (Jalna Lathi Charge) झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार (Firing) पण झाला. या घटनेवरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत या घटनेचा निषेध केला आहे. तर संतप्त आंदोलकांनी (Maratha Reservation Protest) बसेसची जाळपोळ केली. जालन्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) जालना दौऱ्यावर गेले आहेत. याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी लाठीमार प्रकरणी भाजपने (BJP) मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी जालना लाठीचार्जवर (Maratha Reservation Protest) ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज (Jalna Police Lathi Charge) केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर (Dhangar), लिंगायत (Lingayat) आणि मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim Community Reservation) देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढवणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे.मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठिहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे. या लाठी हल्ल्याचा निषेध.

चित्रा वाघ यांचा पलटवार

भाजपने मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, ओ मोठ्ठ्या ताई मराठा समाजासाठी ‘मगरमच्छ के आंसू’ ढाळण्यापेक्षा तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर आज संपूर्ण मराठा समाज तुमचा आभारी राहीला असता.मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायचं एवढेच तुमच्या सिलॅबस मध्ये आहे का ? तुमचा सत्तेत राहण्याचा स्ट्राईक रेट अतिशय उत्तम असल्याचा अभिमान आहे मग मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्याचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा कधी खेद का वाटला नाही?

मराठा समाजाला आरक्षण देण्याची हिम्मत का दाखविली नाही आपण?

ताई, ट्रिपल टेस्ट पूर्ण करणं, सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आणि कोर्टात लढाई लढणं या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस जी (Devendra Fadnavis) यांनी केल्या आहेत.पण तुमचा प्रॅाब्लेम वेगळा आहे. देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुमचं लक्ष्य आहे. राष्ट्रवादी पक्षातील काही मंत्र्यांनी तुमची साथ सोडली म्हणून तुमची जळजळ होणं स्वाभाविक आहे. पण त्याचा राग काढण्यासाठी मराठा आंदोलकांच्या खांद्याचा वापर करू नये, ही विनंती आहे.

तुमच्या कार्यकाळात तुम्ही मावळ मध्ये प्रकल्पग्रस्तांवर गोळीबार (Maval Firing Case) केला होता.
त्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांचे रक्त तुमच्या हाताला लागले आहे.
समाजकल्याणाच्या कामात तुमची रक्तपिपासू वृत्ती उफाळून येते, हा इतिहास आहे.
आता मराठारक्षणाचा खोटा कळवळा दाखवताय? तेव्हा बंदुकीचा चाप ओढताना मात्र तुम्हाला कर्तव्यधर्माचा सोईस्कर
विसर पडला होता. तेव्हा तुमच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही.

आत्ता ही महाराष्ट्र इतके दिवस शांत होता मग आत्ताच कसा काय पेटतोय याची सुद्धा चौकशी व्हायला पाहीजे.
जर हे जाणून बुजून घडवले जात असेल तर त्याचाही छडा लागायला पाहिजे.
ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका ही नम्र विनंती…

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या