Pune Crime News | खोटे सोन्याचे दागिने तारण ठेवऊन फायनान्स कंपनीची फसवणूक, वाघोली परिसरातील घटना; शाखा अधिकाऱ्यासह चार जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खोटे सोने तारण (Fake Gold Mortgage) ठेवून फायनान्स कंपनीची (Finance Company) फसवणूक (Cheating Fraud Case) केली. तसेच फायनान्स मध्ये जमा झालेल्या पैशांचा अपहार करुन फायनान्स कंपनीची 14 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाघोली येथील फायनान्स कंपनीच्या शाखेत घडला आहे. याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या शाखा अधिकाऱ्यासह चार जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कॅपरी गोल्ड लोन (Capri Gold Loans) च्या वाघोली शाखेत 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर तसेच 26 ऑक्टोबर रोजी घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत काशिनाथ विश्वसनाथ गवंड (वय-33 रा. आदर्श नगर किवळे, देहुरोड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शाखा अधिकारी अनिल पाटील (वय-36), लोन ऑफिसर शुभांगी जगदाळे, श्रीकांत मुळे, सेल्स ऑफिसर जयश्री शिंदे यांच्यावर आयपीसी 420, 408, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची कॅपरी ग्लोबल कॅपीटल लि. (Capri Global Capital Ltd.) नावाची नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (Non Banking Finance Company) आहे. या कंपनीची कॉपर गोल्ड लोन नावाने वाघोली येथे शाखा आहे. तर आरोपी अनिल पाटील हा या शाखेत मॅनेजर म्हणून काम करतो. पाटील याने 9 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान शाखेमध्ये चार ग्राहकांच्या नावाने बनावट कर्ज खाते उघडले. या कर्ज खात्यावर सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज दिल्याचे भासवून 7 लाख 88 हाज 973 रुपये कर्ज दिले. मात्र, तारण म्हणून खरे सोन्याचे दागिने ठेवण्याऐवजी पाटील याने बनावट बेन्टेक्सचे दागिने ठेवले. (Pune Crime News)

तसेच 26 ऑक्टोबर रोजी शाखेत जमा झालेल्या एकूण रक्कमेपैकी 6 लाख 85 हजार रुपयांचा परस्पर अपहार केला.
शाखा मॅनेजर पाटील याला इतर आरोपींनी साथ दिली. आरोपी पाटील याने 14 लाख 73 हजार 973 रुपयांचा अपहार करुन
फिर्य़ादी यांच्या फायनान्स कंपनीची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळपे (PSI Kolpe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जीवे मारण्याची धमकी देऊन मित्रानेच केले तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल, हडपसर परिसरातील घटना