Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन मित्रानेच केले तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन मित्रानेच तरुणीचे न्यूड फोटो (Nude Photo) व्हायरल केल्याची धक्कादायक घटना हडपसर परिसरातील घडली आहे. याप्रकरणी एकावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2023 ते शनिवार (दि.27 ऑक्टोबर) दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत हडपसर परिसरात राहणाऱ्या 30 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. तर अनिलकुमार सिद्धनाथ झा (Anilkumar Siddhanath Jha) याच्यावर आयपीसी 354(क), 506, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मागील दोन वर्षापासून आरोपीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत होती. त्यानंतर तरुणी ऑगस्ट पासून आरोपी पासून वेगळ्या राहत होती. आरोपीने फिर्यादी यांना वारंवार फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने फिर्यादी यांचे एकत्र राहत असताना काढलेले न्यूड फोटो तरुणी काम करत असलेल्या ठिकाणीच्या सहकाऱ्यांना मोबाईलवर पाठवून तिची बदनामी केली.
तसेच अश्लील बोलून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप शिवले (PI Sandeep Shivale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना; आरोपीला अटक

खुनाच्या प्रयत्नातील दोन सराईत गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांकडून अटक