Pune Crime News | एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 5 लाखाची फसवणूक

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online)- (Pune Crime News) – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणाकरून त्यांच्याच खात्यातून तब्बल 5 लाख 8 हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (wanwadi police station) काशिनाथ विश्वनाथ ढावरे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News | Fraud of Rs 5 lakh to a senior citizen under the pretext of withdrawing money from an ATM center

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 25 जानेवारी या दिवशी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.
यावेळी एटीएममधून पैसे निघत नसल्याने एटीएम (ATM) मशीन जवळ असणाऱ्या एका व्यक्तीने ‘बाबा तुमचे पैसे निघत नाहीत का ? मी मदत करू का ?” अशी विचारणा केली.
त्यांनीही पैसे काढून देण्यास विनंती केली. त्यादरम्यान हात चलाखीकरत फिर्यादीच एसबीआयचे एटीएम कार्ड काढून घेतले.
आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 25 जानेवारी ते 22 फेब्रुवारी या काळात वेळोवेळी एकूण 5 लाख 8 हजार 115 रुपये काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली.
त्यांनी वानवडी पोलिसांकडे तक्रार दिली.
त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेराची पडताळणी करत तपास सुरू केला आहे.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत.

Web Title : Pune Crime News | Fraud of Rs 5 lakh to a senior citizen under the pretext of withdrawing money from an ATM center

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये स्पाय कॅमेरा लावणार्‍या एमडी डॉक्टरला अटक, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

Weight Loss Tips | लठ्ठपणा कमी करण्यासाठी 5 सर्वात परिणामकारक डाएटिंग टिप्स, आठवडाभरात कमी होऊ लागेल वजन

Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

Pune Crime News | हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास गावठी पिस्तुलासह अटक