Pune Crime News | लोन अकाऊंट बंद करण्याच्या बहाण्याने फसवणूक, येरवडा येथील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | बँकेकडून मंजुर झालेले कर्ज रद्द करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची साडे आठ लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Pune Police) तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै ते ऑगस्ट 2023 दरम्यान येरवडा येथे घडला आहे. (Pune Crime News)

अमोल कोळी, उमेश मालुसरे, पापा मुलाणी यांच्यावर आयपीसी 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ईश्वर भागवत दहीफळे (वय-32 रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) यांनी गुरुवारी (दि.2) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करुन फिर्यादी यांना आयडीएफसी बँकेकडून 5 लाख 87 हजार 511 रुपयांचे लोन मंजुर करुन दिले. मात्र, काही कारणास्तव फिर्यादी यांना कर्ज नको होते. त्यामुळे त्यांनी बँकेशी संपर्क करुन लोन अकाउंट बंद करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क करुन लोन अकाउंट बंद करण्याच्या बहाण्याने कार्जाची रक्कम बँकेत न भरता स्वत:च्या बँक खात्यावर जमा करुन घेतली. (Pune Crime News)

तसेच लोन बंद करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून कागदपत्रे घेतली.
फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करुन
आरोपींनी पे यु फायनान्स (Pay U Finance) या खासगी वित्तसंस्थेकडून 2 लाख 83 हजार रुपयांचे कर्ज
घेऊन ईश्वर दहिफळे यांची 8 लाख 54 हजार 199 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे समजता ईश्वर दहीफळे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे (API Lamkhede) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मारहाण करुन कामगाराचा खून, शिवाजीनगर येथील घटना; 13 जणांवर गुन्हा दाखल

Nitesh Rane On Uddhav Thackeray | जरांगेंचे उपोषण सुटेपर्यंत का थांबला नाहीत?
नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल