Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार टोळी प्रमुख गजाआड, सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील बालाजीनगर परिसरात कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या सनी जाधव व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई (Pune Police MCOCA Action) केली आहे. मोक्का कारवाई केल्यानंतर टोळी प्रमुख सनी जाधव फरार झाला होता. मागील दोन महिन्यांपासून पोलीस (Pune Police) त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर सहकारनगर पोलिसांनी आरोपी सनी शंकर जाधव (वय-26 रा. बिबवेवाडी) याला गुरुवारी (दि.14) अटक केली आहे.

भांडण मिटवण्यसााठी बोलावले असता मारहाण करुन एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी बालाजीनगर येथील के.के. मार्केट येथे घडली होती. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) आयपीसी 307, 323, 504, 506, 34, सह सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच दाखल गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी सनी जाधव याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व निलेश शिवतरे
यांना माहिती मिळाली की, सनी जाधव हा कात्रज येथे राजस सोसायटी चौकातील गणपती मंदिरा जवळ मित्राला
भेटण्यासाठी आला असून मित्राची वाट पाहात थांबला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचुन आरोपीला अटक केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्नाचे दोन, जबरी दुखापत 1, दरोडा 1, मारामारी अशा प्रकारचे 12 गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत (Pune Police MPDA Action) कारवाई करण्यात आली होती. तसेच दोन वर्षा करीता पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षा करीता तडीपार केले होते. पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) करीत आहेत.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (Sr. PI Surendra Malale), पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप देशमाने
(PI Sandeep Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे (Rahul Khandale),
सहायक पोलीस उपनिरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सुशांत फरांदे, महेश मंडलिक,
भुजंग इंगळे, सागर सुतकर, बजरंग पवार, विशाल वाघ, नवनाथ शिंदे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Job Fair | दत्ताभाऊ सागरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रोजगार मेळावा

Ambadas Danve | अंबादास दानवेंचा भुजबळांवर थेट आरोप, जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्याचा ‘हा’ प्रयत्न

Pune Crime News | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने धनकवडी येथील तरुणीची आर्थिक फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर