Pune Crime News | 1200 चे तिकीट 12 हजारांना! भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- Pune Crime News | पुण्यातील गहुंजे (Gahunje) येथील भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याचे (India vs Bangladesh Cricket Match) १२०० चे तिकीट १२ हजार रुपयांना विकणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police Crime Branch) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मुकाई चौक, रावेत येथे काल रात्री अटक केली. तिकिटे पुरवणाऱ्या त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

क्रिकेट वर्ल्डकपमधील (Cricket World Cup) ५ सामने पुण्यातील गहुंजेमधील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (Maharashtra Cricket Association) स्टेडीयमवर होणार आहेत. पाचपैकी एकाच सामन्यात भारताचा सामना असल्याने तिकिटांसाठी क्रिकेटप्रेमींची गर्दी झाली होती. हा भारत विरुद्ध बांगलादेश सामना आज दुपारी दोन वाजता येथे सुरु झाला आहे.

या सामन्याच्या तिकिटांच्या काळ्याबाजारावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचे बारीक लक्ष होते. सध्या वेशातील पोलीस काही दिवसांपासून स्टेडीयम परिसरात पाळत ठेवून होते. दरम्यान, मुकाई चौक, रावेत येथे कोहिनूर सोसायटीच्या समोर काही दलाल क्रिकेट सामन्याची तिकिटे जास्त दराने विकत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. (Pune Crime News)

या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा लाऊन रवी लिंगप्पा देवकर, अजित सुरेश कदम या दोघांना
ताब्यात घेतले. त्यांच्याकडून भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्याची १२०० रुपये दाराची पाच तिकिटे मिळून आली. या दोघांकडून पोलिसांनी ५ तिकिटे, ३८ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन, ७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५१ हजारांचा ऐवज जप्त केला.

रवी देवकर आणि अजित कदम यांना त्यांचा साथीदार युनुस शेख याने ही तिकिटे पुरवल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या तिघांवर रावेत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (IPS Vinay Kumar Choubey), पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे
(IPS Dr. Sanjay Shinde), अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे,
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील
पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, भगवंता मुठे,
मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, रेश्मा झावरे यांनी ही कारवाई केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kashmiri Journalist Safina Nabi | काश्मिरी पत्रकार सफिना नबी यांचा ‘जर्नालिझम फॉर पीस’ पुरस्कार रद्द; राजकीय दबावाची चर्चा

Pune Crime News | लॉटरी लागल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, स्वारगेट परिसरातील घटना

MLA Ravindra Dhangekar | ससून ड्रग्ज रॅकेटचा तपास केंद्रीय यंत्रणेकडे द्या, नार्को टेस्ट करा, काँग्रेस आमदार धंगेकर यांची मागणी

Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, व्हिडिओ केला व्हायरल; पुण्यातील घटना