Pune Crime News | भरलेल्या गॅस सिलेंडर मधील गॅस चोरणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 17.22 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांनी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell) घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये भरुन त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून 17 लाख 22 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime News) केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.29) वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर परिसरात केली.

 

सिंहगड भागात बेकायदेशीरपणे एच.पी. गॅस (H.P. Gas) व भारत पेट्रोलियम गॅस कंपनीच्या (Bharat Petroleum) घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून (Domestic Gas Cylinder) व्यावसायिक वापराच्या गॅस सिरेंडरमध्ये रिफिलिंग (Commercial Gas Cylinder) करुन विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने वडगाव बुद्रुक येथील तुकाईनगर मध्ये छापा टाकला. त्यावेळी चारजण जीवनावश्यक वस्तु कायद्याचा (Essential Commodities Act) भंग करुन घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग पाईपद्वारे व्यावसायिक वापराच्या गॅस भरताना आढळून आले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल केला. (Pune Crime News)

 

या कारवाईत आरोपींकडून घरगुती व व्यावसायिक वापराचे 114 गॅस सिलेंडर, 2 तीन चाकी टेम्पो, 1 चार चाकी टेम्पो व इतर साहित्य असा एकूण 17 लाख 22 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), अनिकेत पोटे (API Aniket Pote)
पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, अजय राणे, बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, हनुमंत कांबळे,
इम्रान नदाफ, रेश्मा कंक, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime News | Gangs stealing gas from filled gas cylinders are busted by crime branch, goods worth 17.22 lakhs seized

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bharti Vidyapeeth | भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये टेक्नो-इनोव्हा 2023 चे उद्गघाटन झाले

Deepak Kesarkar | ‘ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही’, दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला

Pune Crime News | जुन्या कात्रज घाट रोडवरील हॉटेल तोरणाजवळ युवकाच्या खुनाचा प्रयत्न