Pune Crime News | गणेशोत्सवात मोबाईल चोरी करणारी परप्रांतीय टोळी हडपसर पोलिसांकडून गजाआड, 16 लाखांचे 52 मोबाईल जप्त

दोन दिवसांत दोन टोळ्यांना अटक, 72 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात आणि उपनगरामधील गणेश मंडळांचे देखावे, विद्युत रोषणाई पाहण्यासाठी हजारो गणेश भक्त गर्दी करत आहेत (Pune Ganeshotsav 2023) . गर्दीमध्ये लोकांचे मोबाईल चोरण्याऱ्या (Mobile Theft) परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून तब्बल 16 लाख रुपये किंमतीचे 52 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी परप्रांतीय टोळीला अटक करुन 20 मोबाईल जप्त केले होते. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) दोन दिवसात दोन टोळ्यांमधील 9 आरोपींना अटक करुन 72 मोबाईल जप्त केले आहेत. (Pune Crime News)

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील भाजी मंडई, गाडीतळ परिसरात खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. या गर्दीत नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथक व पोलीस मित्र यांच्याकडून 26 सप्टेंबर रोजी गाडीतळ बस स्टॉप, भाजी मंडई परिसरात पेट्रोलींग करण्यात येत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अजित मदने व कुंडलीक केसकर यांना माहिती मिळाली की मोबाईल चोरी करणारे संशयित अन्नती नगर कॅनॉल येथे थांबले आहेत. (Pune Crime News)

पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा रचून शामकुमार संजय राम वय (वय-25 रा. तीनपहाड, नया टोला, पंचायत भवन, ठाणा राजमहल जि. सायबगंज, झारखंड), विशालकुमार गंगा महातो (वय-21 रा. तीन पहाड बाबुपुर, जि. सायबगंज, झारखंड), बादलकुमार मोतीलाल महातो (वय-25 रा. नया टोला, जि. सायबगंज, झारखंड), विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनीया (वय-19 रा. बाबुपुर जि. सायबगंज, झारखंड) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 12 मोबाईल संच सापडले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार गोपी महातो, राहूल महातो (रा. तिनपहाड, जि. सायबगंज, झारखंड) हे 25 सप्टेंबर रोजी येरवडा येथून निघून गेल्याचे सांगितले.

आरोपींचा पूर्वनियोजित कट

चौकशी दरम्यान आरोपींनी मोबाईल चोरीचा पूर्व नियोजीत कट करुन झारखंड येथून पुणे शहर परिसरात आले होते. आरोपींनी मंडई परिसर, चित्रा चौक भाजी मंडई व शहरातील विविध ठिकाणी हातचालाखी करुन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता घरातून 40 मोबाईल संच जप्त केले.

तीन पहाड स्टेशनवर एकत्र भेटले

पुण्यात गणेशोत्सवात जास्त गर्दी असते. त्यादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड स्टेशन येथे एकत्र भेटले. त्यानंतर ते हाटीया एक्सप्रेसने 14 सप्टेंबरला पुणेस्टेशन येथे आले. त्यानंतर त्यांनी पुणे शहराच्या हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केल्याचे सांगितले.

सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

अटक केलेल्या आरोपीपैकी विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनिया व विशालकुमार गंगा महातो हे सराईत गुन्हेगार आहेत. विकीकुमार याच्यावर तीन पहाड थाना जि. पहाडगंज अनुमंडल राजमहल येथे आयपीसी 376 (D)(A) नुसार सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार आहे. तर विशालकुमार याच्यावर तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

2 दिवसात 72 मोबाईल जप्त

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने चार दाखल गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 16 लाखांचे 52 मोबाईल संच जप्त केले आहे. पोलिसांनी दोन दिवसांमध्ये 72 मोबाईल संच जप्त करुन 9 परप्रांतियांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मनोज सकट करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke),

पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे (PI Vishwas Dagle),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले (PI Sandeep Shivle) यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde),
पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अंमलदार सुशील लोणकर,
संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार,
अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने,
चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे,
शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर
कारवाईचा बडगा