Pune Crime News-Honey Trap Case News | IAF मधील वरिष्ठ अधिकारी निखिल शेंडे PAK गुप्तचर यंत्रणेच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये, डॉ. प्रदीप कुरूलकरांच्या एटीएस कोठडीत वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News-Honey Trap Case News | राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) सोमवारी पुण्यातील विशेष न्यायालयात (Pune Special Court) एक धक्कादायक माहिती दिली. डीआरडीओचे (DRDO) संचालक डॉ. प्रदीप कुरूलकरांसारखेच (DRDO Scientist Pradeep M Kurulkar) भारतीय हवाई दलातील Indian Air Force (IAF) एका उच्चपदस्थ अधिकारी निखिल शेंडे ( Nikhil Shende Air Force Officer) यांना देखील पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने (Pakistan Intelligence Agency) हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला असल्याचे एटीएसने (Maharashtra ATS) न्यायालयात सांगितले आहे. दरम्यान, विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी डॉ. प्रदीप कुरूलकर यांच्या कोठडीत दि. 16 मे पर्यंत वाढ केली आहे. (Pune Crime News-Honey Trap Case News)

निखिल शेंडे हे सध्या बंगळुरू (Bengaluru) येथे नियुक्तीस असून त्यांची आयएएफच्या अधिकार्‍यांकडून कसून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र एटीएसने त्यांची चौकशी केली असून त्यांचा शिवाजीनगर न्यायालयातील (Shivaji Nagar Court Pune) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर स्टेटमेंट नोंदविण्यात आले आहे. याबाबतची माहिती एटीएसच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे (Sr PI Sujata Tanawade) यांनी न्यायालयात दिली आहे. (Pune Crime News-Honey Trap Case News)

निखिल शेंडे यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. डॉ. प्रदीप कुरूलकर आणि निखिल शेंडे यांना पाकिस्तानमधील एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून संदेश पाठविण्यात आल्याचे एटीएसच्या तांत्रिक तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. कुरूलकरांना पाकिस्तानातून काही ई-मेल पाठविण्यात आले आहेत. कुरूलकरांनी देशाच्या सुरक्षितेला बाधा आणणारे काही फोटो पाठविल्याचा संशय आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले आहे.

त्याचा अहवाल मिळाला आहे. कुरूलकरांच्या उपस्थितीत हॅन्डसेटमधील काही माहिती घ्यायची असून
त्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिल अ‍ॅड. चंद्रकिरण साळवी
(Adv. Chandrakiran Salvi) यांनी न्यायालयाकडे केली.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव (Judge P. P. Jadhav) यांनी कुरूलकरांच्या कोठडीत दि. 16 मे 2023 पर्यंत वाढ केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News-Honey Trap Case News | Senior IAF officer Nikhil Shende in
PAK intelligence’s ‘honey trap’, Increase in ATS custody of Dr. Pradeep M Kurulkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pandharpur Ashadhi Wari Yatra | पंढरपूर आषाढी यात्रा : श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे