Pune Crime News | शाळेतील मुलींना I LOVE YOU चे मेसेज, जबरदस्तीने KISS घेणाऱ्या शिक्षकास अटक; कोंढव्यातील घटना

पुणे : Pune Crime News | शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअ‍ॅपवर आय लव्ह यु असा मेसेज पाठवून त्यांचा जबरदस्तीने कीस घेणार्‍या शारीरीक शिक्षण शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. शाळेत झालेल्या गुड टच, बॅड टच कार्यक्रमात समुपदेशक महिलेकडे या मुलींनी केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime News)

अविशान गोविंद चिलवेरी (वय २३, रा. येरवडा) असे या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०७/२३) दिली आहे. हा प्रकार कोंढव्यातील एका शाळेत नोव्हेबर २०२२ ते २४ जानेवारी २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून संबंधित शाळेत शारीरीक शिक्षण
शिक्षक आहे. त्याने शाळेतील तीन अल्पवयीन मुलींना त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर आय लव्ह यु असा मेसेज पाठविला.
त्या शाळेत असताना त्यांना जबरदस्तीने कीस घेऊन त्यांना मिठी मारत विनयभंग (Molestation Case) केला
होता. दरम्यान, २४ जानेवारी रोजी शाळेत फिर्यादी यांनी मुलामुलींसाठी गुड टच, बॅड टच हा कार्यक्रम आयोजित
केला होता. या कार्यक्रमादरम्यान या मुलींनी आपल्यावरील प्रसंग फिर्यादी यांना सांगितला.
त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली असून पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | I LOVE YOU messages to school girls, teacher arrested for forcing KISS; Incident in Kondhwa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Accident | चंद्रपूरमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसचा भीषण अपघात; 2 ठार, 17 जखमी

Dilip Malkhede Passed Away | अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांचे पुण्यात निधन