Pune Crime News | येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन खून, 5 आरोपी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वी गोळीबार (Firing In Pune) करुन दोघांचा खून (Pune Murder Case) केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरात एका 21 वर्षाच्या सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करुन खून केल्याची घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अभषेक दत्तू राठोड (Abhishek Dattu Rathod) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी साई उर्फ दादू शंकर पाटोळे Sai alias Dadu Shankar Patole (वय 18), अनिकेत महादेव तुपे Aniket Mahadev Tupe (वय 21), विजय महादेव कांबळे Vijay Mahadev Kamble (वय 19) तसेच त्यांचे इतर दोन अल्पवयीन साथीदार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) आयपीसी 302, 34, 120ब, आर्म अॅक्ट 4 (25), मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(३), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक हा चंदन नगर पोलीस स्टेशनच्या (Chandan Nagar Police Station) पूर्व रेकॉर्डवरील आरोपी होता.
बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ब्रह्मा सनसिटी परिसरात अभिषेक राठोड याच्यावर आरोपींनी कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकचा जागीच मृत्यू झाला. खूनाच्या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळाला भेट दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी त्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली होती. (Pune Crime News)

अभिषेक राठोड याच्यावर खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,
अभिषेक हा काही दिवसांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास तो ब्रह्मा सनसिटी
परिसरात येथे आला होता. यावेळी आठ ते दहा जणांचं टोळकं आलं. त्यांनी अभिषेक याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.
या घटनेत अभिषेकचा जागीच मृत्यू झाला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court On Bhide Wada Smarak | भिडे वाड्यातील भाडेकरूंचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले ! महिन्याभरात वाडा खाली करा अन्यथा पालिकेला भूसंपदानाचे सर्व पर्याय खुले राहतील

Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र