Pune Crime News | भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने केक कापला, सहकारनगर भागात गुंडांचा धिंगाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सहकारनगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने (Sword) केक कापला. बुधवारी (दि.21) मध्यरात्री ही घटना घडली आहे. (Pune Crime News) हा केक कापत असताना टोळक्याने गोंधळ घातल्याने परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण होते.

 

ही घटना बुधवारी फाइव्ह स्टार सोसायटीतील गणपती मंदिर समोर चौकात रात्री बारा वाजता घडली. सहकारनगर पोलिसांनी याप्रकरणी तलवारीने केक कापणाऱ्या तरुणासोबत चार मित्रांना अटक केली आहे. हर्ष आनंद कदम Harsh Anand Kadam (वय-19 रा. साई पार्क अपार्टमेंट, त्रिमूर्ती चौक, धनकवडी), सनी सुभाष दीपक Sunny Subhash Deepak (वय-28 रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर हद्दीतील फाइव्ह स्टार सोसायटी (Five Star Society) समोर गणपती मंदिरासमोर हर्ष कदम याच्या वाढदिवसानिमित्त तो आणि त्याचे मित्र चौकात कार लावून कारच्या छतावर बसून धारदार तलवारीने केक कापला. त्याच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी चौकात मोठा धिंगाणा घातला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं. स्थानिकांनी याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :  Pune Crime News | in sahakarnagar area birthday party was celebrated by cutting a cake with a sword while sitting on the roof of a car in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा