Pune Crime News | चंदन चोरट्यांचे वाढते धाडस; एसआरपीएफ ग्रुपमध्ये जाऊन चंदनाचे झाड नेले चोरुन

पुणे : Pune Crime News | शहरातील अत्यंत सुरक्षित आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या शासकीय कार्यालयांच्या आवारातील चंदनाची झाडे चोरुन नेणार्‍या चंदन चोरट्यांचे धाडस आता आणखी वाढले आहे. त्यांनी चक्क एस आर पी एफ ग्रुपच्या आवारात शिरुन चंदनाचे झाड चोरुन नेले. त्यामुळे आता इतर ठिकाणच्या चोरीचा तपास करताना पोलिसांना पोलिसांच्या आवारातील चोरीचा तपास करण्याची वेळ आली आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा (गु. रजि. नं. ८४/२३) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील रामटेकडी परिसरात एस आर पी एफ ग्रुप १ व २ असे दोन बटालियन आहेत. या ठिकाणी कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश करता येत नाही. दरवाजावर २४ तास पोलिसांचा पहारा असतो. असे असतानाही एस आर पी एफ ग्रुप १ मधील बंगला परिसरातील लोटस पॉड येथे तीन ते चार चंदनचोर शिरले. त्यांनी तेथील चंदनाचे एक झाड कापून चोरुन नेले.
एन सी एल व इतर लष्कर व शासकीय कार्यालयाच्या आवारातील अनेक चंदनाची झाडे यापूर्वी चोरट्यांनी कापून चोरुन नेली आहेत.

Web Title :-Pune Crime News | Increasing courage of sandalwood thieves; Went to the SRPF group and stole a sandalwood tree

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Chinchwad Bypoll Election | सहानुभूती आणि राजकारण वेगळं, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार; नाना काटेंची प्रतिक्रिया

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Aurangabad Crime News | धक्कादायक! आईने झोपेतच पोटच्या मुलांचा घेतला जीव; औरंगाबाद हादरलं