Pune Crime News |  दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएसकडे; 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | राजस्थानमधील जयपूर शहरात बॉम्बस्फोट (Bomb blast in Jaipur city) घडणविण्याचा कट रचणारा मास्टरमाइंड इम्रान खान याच्यासह दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी (Terrorists Arrested in Pune) अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास दहशवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना पकडल्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी येत्या 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलास (Pune City Police) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Crime News)

पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी पहाटे पुणे शहरातील कोथरुड परिसरातून मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी Mohammad Yunus Mohammad Yaku Saki (वय -24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान Mohammad Imran Mohammad Yusuf Khan (वय-23, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा-Kondhwa मुळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना पकडले आहे. तर मोहम्मद शहनवाज आलम Mohammad Shahnawaz Alam  (वय 31) हा फरार झाला आहे. पकडण्यात आलेले दोघे दहशतवादी ‘आयसीस’ या दहशतवादी संघटनेची (ISIS Terrorist Organization) उपसंघटना ‘सुफा’ या संघटनेचे (Sufa Organization) सदस्य असल्याचा संशय आहे. या तिघांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने National Investigation Agency (एनआयए) प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. (Pune Crime News)

इम्रान खान आणि युनूस साकी हे दोघेही ग्राफिक्स डिझायनर (Graphics Designer) आहेत. कोंढव्यात वास्तव्यास असलेल्या कालावधीत त्यांच्या संपर्कात आणखी कोण होते? त्यांनी काही घातपाताचा कट रचला आहे का, याबाबत तपास करण्यात येत आहे. हे तिघे दहशतवादी कोंढव्यातील मीठा नगरमध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात राहत होते. संबंधित घरमालकाने याबाबत कोणताही भाडे करार केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या घराची झडती घेतली असता जिवंत काडतूस, चार मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये काही संशयास्पद कागदपत्रे आढळून आली होती. हे जप्त करण्यात आलेले साहित्य न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (Forensic Laboratory) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) म्हणाले,
दहशतवाद्यांना अटक केलेल्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपविण्यात आला आहे.
पुढील तपासासाठी दोघांना एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तांचे पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शनिवारी (दि. 22) सायंकाळी
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.
15 ऑगस्टच्या (15 August) पार्श्वभूमीवर शहरात अनुचित घटना
टाळण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत, तसेच नाकाबंदी आणि कोंम्बिग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nandurbar Police News |  नंदुरबार जिल्हा पोलिसांचे आणखी
एक कौतुकास्पद श्रमदान