Pune Crime News | पुणे शहरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या जळगाव मधील टोळीला पर्वती पोलिसांकडून अटक, 7 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जळगाव येथून येऊन पुण्यातील दत्तनगर परिसरात वास्तव करुन शहरातील विविध भागात चैन स्नेचिंग (Chain Snatching) करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पर्वती पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News) आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (वय-25 सध्या रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज मुळ रा. प्रजापतनगर, मुंबराबाद रोड जळगाव), लोकेश मुकुंदा महाजन (वय-24 रा. समर्थनगर, खेडी बुद्रुक, जळगाव), प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (वय-25 रा. ज्ञानदेव नगर, जळगाव), संदीप अरविंद पाटील (वय-28 रा. कांचननगर, जळगाव), दिपक रमेश शिरसाठ (वय-25 रा. वरखेडी, ता. पाचोरा जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)

पर्वती दर्शन पुणे येथून रिक्षातुन जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळून गेले होते. हा प्रकार 24 ऑगस्ट रोजी घडला होता. याबात पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घनास्थळापासून विविध प्रकारे आरोपींचा सीसीटीव्ही पाहून शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व किशोर वळे यांनी सीसीटीव्ही पाहून आरोपीच्या गाडीची व आरोपींची माहिती मिळवली. आरोपी आकाश सुर्यवंशी व लोकेश महाजन हे संगमवाडी येथून ट्रॅव्हल्सने जळगाव येथे जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांची पोलीस कस्टडी (Police Custody) घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपी जळगाव येथून पुण्यात येऊन कात्रज येथे वास्तव्य करुन शहरात चैन स्नॅचिंग करुन परत जळगावला जात असल्याची माहिती मिळाली. आरोपींनी जळगाव येथील साथीदारांच्या मदतीने शहरातील भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth Police Station), बिबवेवाडी (Bibwewadi Police Station), सहकारनगर (Sahakar Nagar Police Station), विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या (Vishram Bagh Police Station) हद्दीत चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने जळगाव येथे जाऊन तीन आरोपींना अटक केली.

आरोपींनी जळगाव येथून येऊन शहरात पाच चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणून 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांनी अकोला, जळगाव, अमरावती शहरात चैन स्नॅचिंगचे गुन्हे
केले आहेत. आरोपींवर 30 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
पर्वती पोलिसांनी केलेल्या तपासात जळगाव कनेक्शन समोर आले असून आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का
याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे (PSI Sunil Jagdale) करीत आहेत.

ही कावाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Praveen Patil), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5
सुहैल शर्मा (DCP Suhail Sharma), सिंहगड विभाग (Sinhagad Division) सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे
(ACP Appasaheb Shewale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Senior PI Jairam Paigude),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomne) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे,
चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, किशोर वळे,
अमित सुर्वे, अनिस तांबोळी, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे पाटील, नवनाथ भोसले, अमोल दबडे,
प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar | “मी अटकेपासून वाचवले…” छगन भुजबळांच्या आरोपावर शरद पवारांनी दिले प्रतिउत्तर