Pune Crime News | कोंढवा : भाईच्या परवानगीशिवाय मंडप कसा टाकला?; हॉटेलबाहेर शेड टाकल्याने 3 लाखांची खंडणी मागणार्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime News | रमजान महिन्यात हॉटेल चालू केले. हॉटेलच्या बाहेर मंडप टाकल्याने ३ लाखांची खंडणी (Extortion Case) मागणार्‍या दोघा गुंडांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. समीर पठाण (Sameer Pathan) आणि अन्वर (रा. कोंढवा – Kondhwa News) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

याप्रकरणी मार्केटयार्ड येथे राहणार्‍या एका ४९ वर्षाच्या व्यावसायिकानी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४६/२३) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीचे हॉटेलजवळ व आरोपीच्या ऑफिसमध्ये १५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ व रात्री ९ वाजता घडला. (Pune Crime News)

फिर्यादी यांनी कोंढवा परिसरातमध्ये रमजान महिन्यामध्ये एक मोकळी जागा भाड्याने घेऊन तेथे हॉटेल चालवित आहे.
या वर्षीच्या रमजान महिन्याचे हॉटेल चालू करायचे असल्याने त्यांनी पारगेनगर येथे जागा भाड्याने घेऊन तेथे शेड मारण्याचे काम करत होते.
यावेळी अन्वर हा त्या ठिकाणी आला.
भाईच्या परवानगीशिवाय तू मंडप का टाकलास, तुला ते जड जाईल, अशी धमकी देऊन भाईला भेटायला सांगितले.
त्यामुळे फिर्यादी हे समीर पठाण याच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा समीर पठाण याने तुझ्याकडे भरपूर पैसा आहे.
तु ३ लाख भाडे देऊ शकतोस. माझे नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी ५ लाख रुपये दे, म्हणाला.
त्यानंतर ३ लाख रुपये खंडणी (Ransom Case) मागून फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
पैसे न दिल्यास तू ५ ते ६ महिने बाहेर फिरु शकणार नाहीस, अशी धमकी दिली.
सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे (Assistant Police Inspector Suravse) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Kondhwa: How did you put up the mandap without your brother’s permission?; A case has been filed against those who demanded an extortion of 3 lakhs for putting a shed outside the hotel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Palghar News | संतापजनक ! अवघ्या 500 रुपयांमध्ये 2 अल्पवयीन मुलींना विकले, जव्हारमधील धक्कादायक प्रकार

Anti Corruption Bureau (ACB) Nanded | लाच घेताना पकडलेल्या पोलिसाचे एसीबीच्या जाळ्यातून पलायन

Gold-Silver Rate Today | उच्चांकी दरापेक्षा आज सोनं 6 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर