Pune Crime News | कोंढवा: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍यास जाब विचारणाऱ्या आईला धमकी; रोड रोमिओविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्‍या तरुणाला जाब विचारल्याने रोड रोमिओने (Road Romeo) आईला जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) रोड रोमिओवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

आकाश महेंद्र रोचवानी Akash Mahendra Rochwani (वय २४, रा. इंदिरानगर, महमंदवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

याबाबत घुलेनगर येथील एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८७२/२३) दिली आहे. हा प्रकार कोरिथियन्स क्लबच्या गेटसमोर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १५ वर्षांची मुलगी क्लासमधून घरी येत होती.
रिक्षातून खाली उतरल्यावर आकाश रोचवानी याने तिला धक्का दिला.
तिच्या पायावर पाय देऊन तुझा नंबर दे, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे बोलला. ही मुलगी घाबरुन तेथून पायी घरी चालत जात असताना त्याने तिचा पाठलाग केला. ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी विचारणा केली. तेव्हा त्याने तुम्ही माझेविरुद्ध पोलिसात तक्रार केली तर मी तुमच्याकडे बघून घेईल, असे म्हणून धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक शेख (PSI Shaikh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लोणी काळभोर: तलवारीचा धाक दाखवून उभा चिरण्याची धमकी; खंडणी मागणार्‍या गुंडाला अटक

ACB Trap On Policeman | समन्स बजाविण्यासाठी लाचेची मागणी, पोलिस अंमलदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chitra Wagh | ‘उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त थयथयाट’, चित्रा वाघ यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र (व्हिडीओ)