Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोरेगाव पार्क परिसरातील उच्चभ्रू सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक दाखवुन चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीतील दोघांना कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police Station) अटक केली आहे. त्यांच्याकडून चंदन चोरीचे (Sandalwood Thief) 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. (Pune Crime News)

फारूखाँ कदीरखाँ शोगन (20, रा. जनजाला गाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar) आणि सिराज निजाम लडावत (22, रा. जनजाला गाव, ता. सिल्लोड – Sillod, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोरेगाव पार्क परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. (Pune Crime News)

चंदनाची झाडे चोरी करणारे दोघे दुचाकीवरून कोरेगाव पार्क परिसरातील लेन नं. 5 मध्ये फिरत असल्याची माहिती पोलिस नाईक विवेक जाधव आणि पोलिस प्रविण पडवळ यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिस पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिले. पोलिसांनी त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणून पुन्हा सखोल विचारपुस केली. त्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क परिसरातून चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचे कबुल केले. त्यांनी त्यांचे साथीदार हारूनशा (रा. कटोरा बाजार, ता. भोकरदन – Bhokardan, जि. जालना – Jalna), माशिद / मकसूद नसीम गोलवाड (रा. कटोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना), नसीब (रा. माहूली, ता. सिल्लोड), मुजबी, अनीस, आणि पिनु बाबुराव गालफाडे तसेच इलियासखाँ नजीर खाँ पठाण यांची नावे सांगितली.

 

पोलिसांनी आरोपींकडून चंदन चोरीचे एकुण 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून चंदनाचे ओंडके जप्त केली आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त प्रविण कुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त आर.एन. राजे (ACP R.N. Raje), वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक वेताळ (Sr PI Vinayak Vetal), पोलिस निरीक्षक (गुन्हे) दिपाली भुजबळ (PI PI Deepali Bhujbal ) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे (API Dattatraya Ligade), पोलिस उपनिरीक्षक संभाजी नाईक (PSI Sambhaji Naik), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नामदेव खिलारे (Police Namdev Khilare), पोलिस हवालदार अमर क्षिरसागर, विशाल गाडे, संदिप जढर, पोलिस हवालदार विलास तोगे, रमजान शेख, पोलिस नाईक गणेश गायकवाड, विवेक जाधव, नितीन रावळ आणि प्रविण पडवळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Koregaon Park Police Station – Gang of stealing sandalwood trees
by threatening to kill society’s watchmen arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमधील
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

16 आमदारांचा निर्णय कधी, कशी असेल प्रक्रिया? विधानसभा अध्यक्षांनी लंडनमधून दिली माहिती

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2
कोटींचा गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…