Pune Crime News | कोथरुड : मोबाईल दुकानातून 53 लाखांचे मोबाईल चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानातून चोरट्यांनी तब्बल 53 लाख रुपयांचे 200 महागडे मोबाईल संच चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कोथरुडमधील डहाणूकर कॉलनी परिसरात घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून दुकानात चोरी केली आहे.

याबाबत गौरव शिंदे (वय-31 रा. वारजे) यांनी कोथरुड पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली आहे. गौरव यांचे डहाणूकर कॉलनीत मोबाईल विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा मध्यरात्री उचकटून दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील 200 मोबाईल संच चोरुन नेले. चोरीला गेलेले मोबाईलची किंमत 53 लाख रुपये असल्याचे गौरव यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. (Pune Crime News)

डहाणूकर कॉलनी मधील मोबाईल दुकानातून 53 लाखांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी धाव घेतली. कोथरुड पोलीस ठाण्यातील तपास पथकाने दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे
चित्रिकरण तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप (Assistant Police Inspector Balaji Sanp) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | हडपसर : स्पिकरचा आवाज कमी करायला सांगितल्याने मारहाण करुन माजविली दहशत

26 September Rashifal : कन्या आणि तुळसह या चार राशीच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये होईल वाढ, वाचा दैनिक भविष्य

Asian Games 2023-Rudraksh Patil Thane | एशियन गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक, पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ठरला ‘गोल्डन बॉय’