Maharashtra Monsoon Update | प्रतिक्षा संपली अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | प्रत्येकजण ज्या गोष्टीची काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते. तो दिवस आज उजाडला आहे. अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात (Maharashtra Monsoon Update) आगमन झालं आहे. दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. संपूर्ण गोव्यात तसेच कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशचा काही भाग मान्सूनं व्यापला आहे. याबाबत हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

 

8 जून रोजी केरळमध्ये मान्सून (Monsoon in Kerala) दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon Update) दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून आला आहे. भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department (IMD) ही माहिती दिली असून दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आला आहे.

 

बिपारजॉय चक्रीवादळाने (Biporjoy Cyclone) मार्ग बदलल्याने पश्चिम किनारपट्टी भागात मान्सूच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 48 तासात मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. तर पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा,
हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा
अंदाज पाहता मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.

 

Web Title :  Maharashtra Monsoon Update | monsoon arrived in maharashtra and goa imd announced
that monsoon has arrived in konkan and madhya maharashtra marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा