Pune Crime News | वकिलाची पोलीस अधिकार्‍याला मारहाण; मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शेजारच्याशी अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करणार्‍यास समजावून सांगत असताना वकिलाने सहायक पोलीस निरीक्षकाच्या (API, Pune) अंगावर धावून जाऊन मुठीतील चावीने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police) प्रतीक अंकुश तावरे Pratik Ankush Taware (वय ३५, रा. पायगुने बंगला, धनुर्धारी सोसायटी, मार्केटयार्ड) या वकिलाला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे (API Madan Kamble) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २००/२२) दिली आहे. हा प्रकार २९ डिसेबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील बुराणी कॉलनीत भांडणे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे रात्री तेथे गेले. तेव्हा प्रतीक तावरे हे त्याच्या घराशेजारी राहणारे हर्षल लाहोटे यांना अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करीत होते. फिर्यादी यांनी त्यांनासमजावून सांगून शांत करीत असताना तो मी वकील आहे, असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करुन पोलीस अधिकार्‍यांना हाताने बाजूला ढकलले.
तसेच त्यांच्या अंगावर धावून येऊन हल्ला केला.
हातातील चावीच्या टोकाने फिर्यादीचे तोंडावर मारुन डाव्या डोळ्याजवळ व पापणीवर दुखापत केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Lawyer assaults police officer; Incidents in the Marketyard area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा