Pune Crime News | मालक – चालक यांच्या वादात हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना ठेवले कोंडून; लोणी स्टेशन येथील घटना

पुणे : Pune Crime News | रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे हे खासगी कंपनीला भाड्याने दिले. कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. त्यानंतर मालक व चालक यांच्यात भाड्यावरुन झालेल्या वादातून मालकाने बिल्डींगच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून विद्यार्थ्यांना कोडून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) स्वत: फिर्याद होत चौघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. विद्याधर व्यंकटराव वाघधारे, सत्यभामा विद्याधर वाघधरे (दोघे रा. कल्पतरु सोसायटी, महंमदवाडी, हडपसर), केदार किसन चंदनशिव व ओमकार किसन चंदनशिव (दोघे रा. संभाजीनगर,धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोणी स्टेशन येथील स्टान्झा लिव्हिंग बिल्डिंगमध्ये शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डिंग मालकांनी स्टान्झा लिव्हिंग इमारत कोणताही भाडेकरार न करता रहिवासी इमारतीमधील निवासी गाळे डी व्टेल्व स्पेसेस प्रा. लि. या कंपनी हॉस्टेल व्यवसाय चालविण्या करीता दिले. कंपनीने तेथे हॉस्टेल सुरु केले. दरम्यान, कंपनी चालक व इमारतीचे मालक यांच्यात भाडे देण्यावरुन वाद झाला. त्यातून आरोपींनी इमारतीच्या प्रवेशद्वारालाच बाहेरुन कुलूप लावून विद्यार्थ्यांना आत कोंडून ठेवले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी विद्यार्थ्याची सुटका केली. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Locked up students in hostels due to owner-driver dispute; Incident at Loni Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना

Buldhana Crime News | शेतीच्या पैशावरुन झालेल्या वादातून वृद्ध शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

Samantha Ruth Prabhu | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला समांथा रुथ प्रभूचा नकार; समोर आले खरे कारण