Pune Crime News | तडीपार गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपारीच्या आदेशाचे (Tadipar Criminal Arrested) उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28) सकाळी दहाच्या सुमारास उरुळी देवाची (Uruli Devachi) येथे करण्यात आली. राहुल उर्फ मॉन्टी सुनील कुचेकर (वय 20 रा. फ्लॅट नंबर 101, जय शंकर अपार्टमेंट, आई माता मंदिरामागे, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई योगेश पाटील यांना माहिती मिळाली की बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार राहुल उर्फ मॉन्टी कुचेकर हा उरुळी देवाची जवळ रस्त्याच्या कडेला थांबला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने उरुळी देवाची येथून आरोपीला ताब्यात घेतले. राहुल उर्फ मॉन्टी कुचेकर हा बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील अभिलेखावरील आरोपी आहे. परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त यांनी आरोपीला 8 ऑगस्ट 2023 रोजी पुणे शहर व परिसरातून तडीपार केले होते. आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Sr PI Shashikant Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore), पोलीस अंमलदार योगेश पाटील, बोरावके, सायकर, देवीकर, वीर
यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या मुलाची केली हत्या, स्वत: घेतला गळफास

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून