Pune Crime News | लोणीकंद पोलिसांची हातभट्टी दारु बनविणाऱ्या भट्टीवर कारवाई, दारु बनवण्याचे 3 हजार लिटर कच्चे रसायन केले नष्ट

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद पोलीस (Lonikand Police आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) संयुक्तपणे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्ट्यांवर कारवाई करत मौजे पेरणे, भावडी व अष्टापुर येथील हातभट्टी उद्धवस्त केली. या कारवाईत (Pune Crime News) पोलिसांनी दीड लाख रुपयांचा हातभट्टी दारुचा माल नष्ट केला. ही कारवाई गुरुवारी (दि.9) केली.

भावडी गाव येतील बोरकर मळा येथे करण्यात आलेल्या कारवाईत 500 लिटरच्या तीन टाक्या फोडून त्यातील दीड हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट (Hatbhatti Chemicals Destroyed) केले. तसेच डोंगर गाव ओढ्या लगत सिमेट विट बांधकाम केलेली टाकी फोडून त्यातील दीड हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन नष्ट करुन लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 1 लाख 53 हजार रुपये किमतीचे 3 हजार लिटर हातभट्टीचे कच्चे रसायन, हातभट्टी दारु व हातभट्टी बनवण्याचे इतर साहित्य नष्ट करण्यात आले. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे
(DCP Shashikant Borate), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय झुरुंगे (PSI Dattatraya Zurunge),
पोलीस अंमलदार दिपक ठाणगे, बाळासाहेब सकाटे, संदेश शिवले, अमोल भोसले, नितीन मोरे, बाळासाहेब तनपुरे,
सागर पाटील, तुषार पवार, प्रशांत धुमाळ, बेलेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime News | Lonikand police action on hand furnace for making alcohol, 3000 liters of raw chemical for making alcohol was destroyed