Pune Crime News | हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर लोणीकंद पोलिसांचा छापा, 1000 लिटर रसायन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील कदम वस्ती येथील ओढ्या जवळ लावलेल्या एका हातभट्टी दारू भट्टीवर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाईत 70 लिटर दारु, एक हजार लिटर रसायन यासह इतर मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.9) करण्यात आली असून एकाला अटक केली आहे. (Pune Crime News)

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे सुरु असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांच्या तपास पथकाने पेरणे गावच्या हद्दीत कदम वस्ती येथील दशरथ वाळके यांच्या जमिनीलगतच्या ओढ्याजवळ धनाजी परदेशी यांच्या घराच्या पाठिमागील मोकळ्या जागेत दारु भट्टी सुरु केल्याचे आढळून आले. पथकाने याठिकाणी छापा टाकून 70 लिटर दारु, एक हजार लिटर रसायन, दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, पाईप व इतर साहित्य ताब्यात घेऊन नष्ट केले. (Pune Crime News)

पोलिसांनी हातभट्टी चालकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अजित फरांदे करीत आहेत. यापूर्वी चालू वर्षात पेरणे गावच्या हद्दीतील मौजे भावडी येथे पोलिसांनी छापा टाकुन हातभट्टी उद्धवस्त केली होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग
रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या
सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे
सिमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे पोलीस अंमलदार
संदीप तिकोणे, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास 9527069100 या क्रमांकावर संपर्क
साधून माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी नागरिकांना केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parth Ajit Pawar – PDCC Bank Pune | पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार?