Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – फिर्याद दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले चोरट्यांना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मालक हॉटेल बंद करुन घरी गेल्या नंतर कामगारांनी हॉटेल उघडले. आतील रोकड व साहित्य चोरले. ते घेऊन जात असताना पोलिसांनी तिघा कामगारांना पकडले. (Pune Crime News)

नूर आलम ऊर्फ साबीर अकबर शेख Noor Alam alias Sabir Akbar Shaikh (वय ३०), इम्रान मोहंमद सलीम शेख ऊर्फ राजेश जॉन शेख Imran Mohammad Saleem Shaikh alias Rajesh John Shaikh (वय २०), जहांगीर नजिरुल मोल्ला Jahangir Najirul Molla (वय २७, सर्व रा. दक्षिण २४, परगणा, पश्चिम बंगाल – West Bengal) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत नितीन राजाराम कोंढाळकर (वय ५२, रा. आंबेगाव, कात्रज) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४८/२३) दिली आहे. हा प्रकार गंगाधाम बिबवेवाडी (Gangadham Bibwewadi) येथील हॉटेलमध्ये शनिवारी रात्री ११ ते रविवारी पहाटे २ वाजेच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये तीनही आरोपी कामगार आहेत.
फिर्यादी हे शनिवारी रात्री हॉटेल बंद करुन घरी गेले.
त्यानंतर त्यांच्याकडील कामगारांनी बनावट चावीने हॉटेलचे कुलूप उघडले.
आत प्रवेश करुन २५ हजार रुपयांचे नुकसान केले. हॉटेलमधील १० हजार रुपये रोकड, होम थिएटर, एम्प्लीफायर,
डीव्हीआर, डीव्हाईस, कॅमेरे, राऊटर असे एकूण ५० हजार ७०० रुपयांचा माल चोरला.
हा माल ते घेऊन जात असताना पहाटे २ वाजण्याच्या सुमारास गस्त घालणार्‍या पोलिसांनी त्यांना पकडले.
त्यातून चोरीचा हा प्रकार समोर आला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Marketyard Police Station – The police caught the thieves before the complaint was filed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari Warn Contractor | ‘कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकेल’; गडकरींचा कंत्राटदाराला थेट इशारा

NCP Chief Sharad Pawar | एकाचवेळी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का? ठाकरे गटाचा अग्रलेखातून सणसणीत सवाल

Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर