Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) मांडीवर जाऊन बसले, अशा शब्दात शहांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. शहांच्या टीकेला खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी टीकास्त्र सोडले होते. संजय राऊतांनी अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Maharashtra Politics News)

अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, अमित शाह यांनी ठाकरे गटाचा धसका घेतला आहे. यावर संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी ही टीका केलेली नाही. आमच्या मराठी भाषेत याला चोमडेपणा म्हणतात. कोणाची तळी कशी उचलायची याचा प्रयोग संजय राऊत यांनी केला असल्याची टीका शिरसाट यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Maharashtra Politics News)

अमित शाह कुठे, उद्धव गट कुठे?

शिरसाट पुढे म्हणाले, कसला धसका घेतला आहे? अमित शाह कुठे, उद्धव गट कुठे? कुठेतरी बरोबरी करा, मात्र, यांनी दरवेळेला ठाकरेंच्या कानात सांगून सांगून आपला रुबाब मोठा, आपण मोठे आहोत, सगळा देश तुम्हाला घाबरतो, या अविर्भावात सांगत होतात यामुळे गटाचं अधःपतन झालं आहे. अमित शाह काय धसका घेणार? तुम्हाला सांभाळता आलं नाही. तुमच्या छातीवर चढून तुमची सत्ता गेली हे मान्य करा. तुमची सत्ता गेली हे मान्य करायला काय जातं? परंतु, गिरे तो भी टांग उपर हा प्रकार होतोय, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

राजकारणाला लागलेली ही कीड

ज्या मातोश्रीवर अमित शाह यायचे, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यायचे, राष्ट्रपती पदाचे उमेदवार यायचे
ती मातोश्री लोकांच्या दारावर कटोरा घेऊन जाते याचं दुःख आम्हाला होतंय. त्यामुळे करणारा करविता आहे, या देशात संजय राऊतांसारखा पागल माणूस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली ही कीड आहे. या किडीमुळे ठाकरे गटाचं अधःपतन झालं. अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.

Web Title :  Maharashtra Politics News | sanjay shirsat criticize to sanjay raut saying he is insect of maharashtras politics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचा दर किती? जाणून घ्या

Biporjoy Cyclone Update | बिपोरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; ‘IMD’ चा इशारा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक