Pune Crime News | वानवडी, हडपसर, महंमदवाडी रोड परिसरात दहशत निर्माण करणार्‍या विराज यादवसह त्याच्या 6 साथीदारांवर ‘मोक्का’ (MCOCA)

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंतची 32 वी MCOCA कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वानवडी, हडपसर (Hadapsar), महंमदवाडी रोड (Mohamadwadi Road) परिसरात दहशत निर्माण करणार्‍या विराज जगदीश यादव आणि त्याच्या इतर 6 साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई केली आहे. विराज यादव आणि त्याच्या इतर साथीदारांनी दि. 6 जून 2023 रोजी ससाणे वस्ती येथे एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वानवडी पोलिस स्टेशनमध्ये दाखल आहे. त्या गुन्हयामध्ये यादव टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

विराज जगदीश यादव Viraj Jagdish Yadav (25, रा. हांडेवाडी रोड, आनंदनगर, हडपसर), यश सुनिल ससाणे Yash Sunil Sasane (22, रा. सय्यदनगर, महंमदवाडी रोड, हडपसर), चेतन बाळु जाधव Chetan Balu Jadhav (21, रा. अपेक्षत्त पॅलेस बिल्डिंग, ससाणेनगर, हडपसर), गुफ्या उर्फ गुफरान उर्फ मतीन फिरियाज खान Gufya alias Gufran alias Matin Firiyaz Khan (21, रा. हडपसर), गुलाम गौस मुस्तफा खान Ghulam Gaus Mustafa Khan (21, रा. हडपसर), अक्षय नाथनाथ कांबळे Akshay Nathnath Kamble (23, रा. हडपसर) आणि अथर्व नंदु शेंडगे Atharva Nandu Shendge (20, रा. विठ्ठलनगर, मांजरी फाटा, हडपसर) यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी यश सुनिल ससाणे आणि गुफ्या उर्फ गुफरान उर्फ मतीन फिरियाज खान यांना अटक करण्यात आलेली आहे तर बाकीचे सर्व आरोपी फरार आहेत. (Pune Crime News)

 

टोळीप्रमुख विराज यादवने त्याच्या साथीदारासह स्वतःचे टोळीचे परिसरात वर्चस्व निर्माण व्हावे आणि त्यातुन आर्थिक व इतर फायदा मिळविण्यासाठी गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी म्हणुन वानवडी पोलिसांकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास मंजुरी मिळाली असून विराज यादव टोळीविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे
(ACP Shahuraje Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे
(Sr PI Bhausaheb Pathare), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले (PI Sandeep Shivle),
पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले (PSI Ajay Bhosale), पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे
(PSI Santosh Sonawane), पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार (PSI Dhyandev Shelar),
पोलिस अंमलदार मनोज साळुंखे, अमोल घावटे, उत्तरेश्वर धस यांनी केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | MCOCA Action On Viraj Jagdish Yadav And Other 6 Criminals Wanwadi Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा