Pune Crime News | पुणे रेल्वे स्थानकावर मोबाईल चोराला अटक, 20 मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आलेल्या एका मोबाईल चोराला लोहमार्ग पोलिसांच्या (Pune Railway Police) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 20 मोबाईल संच जप्त केले आहेत. ही कारवाई पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) परिसरात करण्यात आली. धमेंद्र लालबिहारी साह (वय-24 सध्या रा. दांडेकर पूल, मुळ रा. मुझफ्फरपूर, बिहार) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात चोरीचे मोबाईल विक्री करण्यसाठी एकजण येणार असल्याची माहिती पुणे लोहमार्ग पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून आरोपी धमेंद्र साह याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 20 मोबाईल आढळून आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच मोबाईल विकून मूळगावी जाणार असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (SP Srikanth Dhiware), अतिरिक्त अधीक्षक गणेश शिंदे,
उपविभागीय अधिकारी देवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड
(Sr PI Rajendra Gaikwad), पोलीस निरीक्षक वासनिक, सहायक निरीक्षक झोडगे, पोलीस अंमलदार कदम, दांगट, टेके,
कांबळे, बोरनारे, बिडकर, मधे, केंद्रे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जिओ कस्टमर केअर मधून बोलतोय! पुण्यातील तरुणीला 5 लाखांचा गंडा

Chitra Wagh On Supriya Sule | राज्याच्या मोठ्ठ्या ताई…तुमची चॉईसच वेगळी, महाराष्ट्र तरी काय करणार?, चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका (व्हिडिओ)