Pune Crime News | पुण्यातील तानाजी जाधव व त्याच्या 2 साथीदारांवर मोक्का कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 26 गँगवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Retesh Kumaarr) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या (Lonikand Police Station) हद्दीतील सराईत गुन्हेगार तानाजी जाधव (Tanaji Jadhav) व त्याच्या इतर दोन साथीदारांवर मोक्का कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 26 गँगवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

टोळी प्रमुख तानाजी अर्जुन जाधव (वय-22 रा. लाडबा वस्ती, केसनंद, ता. हवेली), रोहित राजु माने (वय-21 रा. गुजर वाडी, खोपडे नगर, कात्रज), ओमकार नरहरी आळंदे (वय-21 रा. वडगाव रोड, केसनंद, ता. हवेली) यांना लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक (Arrest) करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

आरोपींनी 4 मे रोजी लोणीकंद-केसनंद रोडवरील भंगार विक्रेत्याला एकटे गाठून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी भंगार विक्रेत्याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याला मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून नेले. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात आयपीसी 394,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) आहेत.

टोळी प्रमुख तानाजी जाधव याने साथिदारांच्या मदतीने जबरी चोरी, गंभीर दुखापत करुन जबरी चोरी, देवाच्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणे, तसेच चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार (Senior PI Gajanan Pawar) यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त (Addl CP) रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर केला होता. त्यास त्यांनी मान्यता दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav) करीत आहेत.

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (Joint CP)
संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे मारुती पाटील (PI Maruti Patil),
सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत टेमगिरे (PSI Srikant Temgire),
रामकृष्ण दळवी (PSI Ramakrishna Dalvi) व सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे,
सागर कडु यांच्या पथकाने केली.

 

Advt.

Web Title :  Pune Crime News | Mocca action against Tanaji Jadhav and his 2 accomplices in Pune,
MCOCA on 26 gangs so far by Police Commissioner Retesh Kumaarr

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘सावरकर बनण्याची तुमची औकात नाही’, देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर घणाघाती टीका (व्हिडिओ)

MP Supriya Sule | रखरखत्या उन्हात उभ्या प्रवाशांसाठी खासदार सुप्रिया सुळे मायेची पाखर होऊन धावल्या; बंद पडलेल्या शिवशाहीतील प्रवाशांना स्वतःच्या गाडीसह अन्य गाड्यांतून सावलीत हलवले (Video)

MLA Sunil Raut | ‘…तर संजय राऊत साडेतीन महिने तरुंगात गेले नसते’, नितेश राणेंच्या ‘त्या’ टीकेला सुनील राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर