Pune Crime News | बी.टी. कवडे रोडवरील किराणा दुकानातून पैसे चोरणाऱ्या दोघांना मुंढवा पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | किराणा दुकानाचे (Grocery Store) मालक बाहेर गेल्याची संधी साधून दुकानातील काउंटरमधून पैसे चोरून नेल्याची (Stealing Money) घटना 22 जुलै रोजी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Pune Crime News) वठारे मळा येथे घडली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे.

चंद्रकांत राजु जाधव Chandrakant Raju Jadhav (वय-24), राहुल इश्वर सितापुरे Rahul Ishwar Sitapure (वय-29 दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत किराणा दुकनदार यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी 380, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

या गुन्ह्याचा तपास करताना तपास पथकाने चोरी झालेल्या दुकानातील सीसीटीव्ही व दुकानासमोरील रोडवरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरु केला. पोलिसांनी जवळपास 50 सीसीटीव्ही तपासून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेली रक्कम जप्त केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख
(ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane), पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप काकडे (PI Pradeep Kakade), सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे (API Sandeep Jore), पोलीस अंमलदार दिनेश राणे, दिनेश (नाना) भांदुर्गे, वैभव मोरे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला’,
नाना पटोलेंची सडकून टीका

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच मागणारा क्लास वन अधिकारी
अँन्टी करप्शनच्या जाळ्यात