Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मुंढवा पोलिस स्टेशन – घोरपडी पोलिस चौकीत राडा ! साडी फेडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, 5 जणांना अटक

पुणे : Pune Crime News | मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुंढवा पोलिस स्टेशनच्या (Mundhwa Police Station) अंकित असलेल्या घोरपडी पोलीस चौकीसमोर (Ghorpadi Police Chowki) जमाव जमवून पोलीस चौकीत फक्त पुरुष कर्मचारी असल्याचा गैरफायदा घेऊन महिलेने स्वत:ची साडी फेडून अश्लिल शिवीगाळ (Obscene Abuse) करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची (False Molestation Case) धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. विद्या दिलीप सरदार (वय ४२), राजेश्री स्वामीनाथन पिल्ले (वय ४९), निर्मला वेल्लुस्वामी (वय ५७), कार्तिक नायकर (वय ३२, रा. ढवळे वस्ती, घोरपडी), अजय दिलीप सरदार (वय २३, रा. भारत फोर्ज रोड, घोरपडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार तुळशीराम रासकर (Police Tulshiram Raskar) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १५२/२३) दिली आहे. हा प्रकार घोरपडी पोलीस चौकीत गुरुवारी दुपारी दीड वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या सरदार यांच्या मुलीने प्रेमविवाह केला. त्याचा राग मनात धरुन कार्तीक नायकर याने शिवीगाळ करुन धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादी कार्तिक याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने १४९ नुसार नोटीस बजावित होते. यावेळी सरदार यांच्या मुलीने प्रेमविवाह केला याचा राग मनात धरुन सर्व जण घोरपडी पोलीस चौकीत जमले. त्यावेळी घोरपडी पोलीस चौकीमध्ये फक्त पुरुष अधिकारी व अंमलदार हजर होते. हे त्यांना तेथून शांततेत निघून जा, असे समजावित असताना एका महिलेने स्वत:च्या अंगावरील साडी स्वत: फेडून फिर्यादी व सहायक पोलीस निरीक्षक सुतार व इतर अंमलदार यांचे अंगावर मारण्याकरीता धावून जाऊन अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो असे धमकाविले. इतरांनी फियार्दींना शिवीगाळ करुन मारण्याकरीता अंगावर धावून गेले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), मुंढवा पोलिस स्टेशनचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे (Sr PI Ajit Lakde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे
(PI Pradeep Kakade), सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर (PSI Pramod Kolekar) यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार (API Vilas Sutar) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Mundhwa Police Station – Ghorpadi Police Station! Threatening to file molestation case by opening saree, 5 people arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी