Maharashtra Political Crisis | ‘…तरीही निर्लज्जासारखं हसतायत’, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकिलांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवार (दि.11) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल दिला. न्यायालयाने शिंदे गट (Shinde Group) आणि राज्यपाल (Governor) यांचे काही निर्णय चुकीचे आणि बेकायदेशीर (Maharashtra Political Crisis) असल्याचे निरीक्षण नोंदवले. राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय चुकीचे होते. तर शिंदे गटाने भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रतोद पदावर केलेली नियुक्ती बेकायदेशीर होती, असं न्यायालयाने म्हटले.

तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना सत्तेत परत बोलावणं शक्य झालं होतं. मात्र सध्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा (Maharashtra Political Crisis) देण्यास सांगणं हे योग्य नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत (MLA Disqualified) विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील असंही न्यायालयाने म्हटले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते.

 

शिंदे-फडणवीस यांच्या याच कृत्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण (Adv. Prashant Bhushan)
यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, शिंदे गटाचा व्हिप बेकायदेशीर (Whip Illegal) होता आणि राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक ठराव घेण्यास सांगणं, हेही बेकायदेशीर कृत्य होतं, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. तरीही न्यायलाने त्यांना खुर्चीवरुन हटवलं नाही, त्यामुळे ते निर्लज्जासारखं हसतायत. पण लोक येत्या निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील, यात काही शंका नसल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis prashant bhushan tweet on eknath shinde and devendra fadnavis supreme court verdict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune News | एरंडवणे-कर्वेनगर भागातील प्रलंबीत कामे लवकर पूर्ण करा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांची मागणी

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक
दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीला अटक

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमधील
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या