Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड येथील 36 वर्षीय युवकाचा खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | धारदार हत्याराने सपासप वार करून सिंहगड रस्ता (Sinhagad Raod Pune) परिसरातील नांदेड (Nanded Gaon) येथे राहणार्‍या एका 36 वर्षीय युवकाचा खून (Murder In Pune) करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

राहुल चंद्रकांत आटोळे Rahul Chandrakant Atole (36, रा. गोसावी वस्ती, नांदेड, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. खूनाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस स्टेशनमधील (Haveli Police Station) अधिकारी व पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंहगड रस्ता परिसरातील नांदेडमधी गोसावी वस्ती येथे राहणारे राहुल चंद्रकांत आटोळे हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळच्या वेळी परिसरातील नागरिकांनी रोडच्या कडेला असणार्‍या झाडा-झुडपात एक डेडबॉडी पाहिली. नागरिकांनी लागलीच त्याची खबर हवेली पोलिसांना दिली.

घटनेबाबत माहिती समजल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन वांगडे (Police Inspector Sachin Wangde), पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे (PSI Dilip Shinde), पोलिस हवालदार अशोक तारू, पोलिस नाईक संतोष भापकर, प्रवीण ताकवणे आणि राजेंद्र मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणीतरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने वार करून मृतदेह झाडा-झुडपात टाकून देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी काढला आहे.

आटोळे यांचा खून नेमक्या कोणत्या कारणारून झाला आणि कोणी केला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास हवेली पोलिस करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Murder of a 36-year-old youth from Nanded in Sinhagad road area Haveli Police Station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – फिर्याद दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी पकडले चोरट्यांना

Maharashtra Politics News | अजित पवार परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं, सामनातील अग्रलेखावरुन राष्ट्रवादीचा संजय राऊतांवर पलटवार

Nitin Gadkari Warn Contractor | ‘कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकेल’; गडकरींचा कंत्राटदाराला थेट इशारा

NCP Chief Sharad Pawar | एकाचवेळी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का? ठाकरे गटाचा अग्रलेखातून सणसणीत सवाल

Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर