Maharashtra Politics News | अजित पवार परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालं, सामनातील अग्रलेखावरुन राष्ट्रवादीचा संजय राऊतांवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन नुकताच झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी पक्षात मोठे बदल करत दोन कार्यकारी अध्यक्षांची नावे जाहीर केली. महाराष्ट्रासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि इतर राज्यांसाठी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांची नावे जाहीर केली. या निवडीवरुन ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. (Maharashtra Politics News) यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त सुरज चव्हाण (NCP Spokesperson Suraj Chavan) यांनी पलटवार करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हटले सामनाच्या अग्रलेखात?

भविष्यातील राजकारणाचा विचार करून शरद पवारांनी पक्षात काही प्यादी हलवली आहेत. नव्या रचनेत कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आली आहे. दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, राजस्थान वगैरे प्रदेश पाहतील. शरद पवारांनी भाकरी फिरवली नसून आता कोठे चुलीवर टाकली आहे. भाकरी कच्ची राहू नये म्हणून ती फिरवावीच लागते. आधीची भाकरी करपल्याने नवी भाकरी थापली असेल तर वाट पाहावी लागेल, असं अग्रलेखात म्हटले आहे. (Maharashtra Politics News)

अजित पवार परत आल्यामुळे..
.
अग्रलेखावरुन संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका करताना सुरज चव्हाण म्हणाले, राऊत साहेब तुमच्या
पक्षाच तुम्ही पाहा, अजित पवार (Ajit Pawar) परत आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)
यांचे शिवसेनेचा (Shivena) मुख्यमंत्री करण्याच स्वप्न पूर्ण झालं. राष्ट्रवादीच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्रीपदाच
स्वप्न पूर्ण केलं. हे तुम्ही लक्षात ठेवलं असतं तर तुम्हाला अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती.
आमची भाकरी फिरली का नाही हे पाहण्यापेक्षा तुमची चुलीवरची भाकरी आणि चूल ज्यांनी पळवून नेली
त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं तर अग्रलेख लिहिण्याची वेळ आली नसती, असा टोला चव्हाण यांनी लगावला.

Web Title :    Maharashtra Politics News | ncp spokesperson suraj chavan criticized shiv sena ubt mp sanjay raut mp supriya sule praful patel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Gadkari Warn Contractor | ‘कामात गडबड झाल्यास मला कळवावे, त्याला रगडून टाकेल’; गडकरींचा कंत्राटदाराला थेट इशारा

NCP Chief Sharad Pawar | एकाचवेळी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का? ठाकरे गटाचा अग्रलेखातून सणसणीत सवाल

Maharashtra Politics News | ‘याला चोमडेपणा म्हणतात, राऊतांनी ठाकरेंच्या कानात सांगून…’, अमित शहांवर केलेल्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर