Pune Crime News | धक्कादायक! पुण्यात कचऱ्यात सापडले नवजात अर्भक, सिंहगड रस्ता परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात एक पुरुष जातीचे नवजात अभ्रक (Newborn Baby) कचऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील धायरी फाटा येथील सणस शाळेजवळील (Sanas School) एका दुकानासमोरील रस्त्यावर शुक्रवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास हे अभ्रक सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन ससूनला पाठवले आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास एका कचरा वेचणाऱ्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नवजात अर्भक दिसले. त्याने लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेऊन ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) पाठवले.( Pune Crime News)

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केला असून हे बाळ कोणाचं आहे आणि असे कोण निर्दयी आई-बाप आहेत, ज्यांनी पोटच्या गोळ्याला असं कचऱ्यात फेकून दिलं. याचा तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

दरम्यानं, याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार
असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हे अर्भक कचराकुंडीत कोणी फेकलं हे शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज
तपासले जाणार आहे. परंतु अशा प्रकारे नवजात अर्भकाला फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात
खळबळ उडाली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोक्का गुन्ह्यातील फरार टोळी प्रमुख गजाआड, सहकारनगर पोलिसांची कारवाई

Pune Narayangaon ATS Action | एटीएसने नारायणगावातून ८ बांगला देशी नागरिकांना पकडले

आत्महत्या करण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा मानसिक छळ, तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा; कोंढवा परिसरातील घटना