Pune : जाब विचारल्यानंतर बाप-लेकाची धुलाई, कात्रज परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वार तरुणाला जाब विचारल्यानंतर त्याने व त्याच्या सात ते आठ साथीदारांनी बाप-लेकला बेदम मारहाण केली. कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी जिशान शेख (वय 18) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिशान याचे वडील रिक्षा चालक आहेत. तो आणि वडील रिक्षा घेऊन घरी जात होते. ते अखिल संतोषनगर चौकात आले असता समोरुन विरुद्ध दिशेने दुचाकीवर दोघेजण आले. यामुळे त्यांनी विरुद्ध दिशेने आला आहेस तुझ्या रस्त्याने जा की असे सांगितले. याचा राग या दोघांना आला. यातील एकाने लोखंडी पाईपने फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर पुन्हा साथीदारांना बोलवून फिर्यादी व त्याच्या वडिलांना लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.