Pune Crime News | गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांकडून एकास अटक, चार लाखांचा गांजा जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विक्रीसाठी बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी (Pimpri Police) एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे चार किलो गांजा जप्त (Ganja Seized) करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास बालाजी नगर एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली. (Pune Crime News)

बापू प्रभू मदने (वय 38, रा. सोनगिरी, ता. भूम, जि. धाराशिव) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विशाल हनुमंत काळे (वय-35) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी नगर येथील नाल्याच्या बाजूला एकजण गांजा विक्रीसाठी आला
असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून आरोपी
बापू मदने याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 3 लाख 97 हजार 200 रुपयांचा तिन किलो 972 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Meeting | कॅबिनेटमध्ये गँगवॉरसारखी परिस्थिती, एका मंत्र्याच्या… संजय राऊतांच्या आरोपाला हसन मुश्रीफांचे उत्तर

Pune Police Mcoca Action | तलावारीचा धाक दाखवून व्यवसायिकांना लुटणाऱ्या रोहन चव्हाण व त्याच्या 5 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 81 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA