Pune Crime News | पोलिस संरक्षण प्राप्त असलेल्या बिल्डर संतोष पवारकडून एकावर गोळीबार; सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील घटना

एकजण जखमी, पोलिसांकडून आरोपी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवर (Sun City in Sinhagad Road) बांधकाम व्यावसायिकाने एकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी भर दुपारी घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला असून गोळीबार करणार्‍या संतोष पवार (Santosh Pawar) याला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) ताब्यात घेतले आहे. रमेश राठोड (रा. वारजे माळवाडी, पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर (WhatsApp Group) झालेल्या चॅटिंगवरून बाचाबाची झाली अन् बांधकाम व्यावसायिक (जमीन विकसक) संतोष पवारने रमेश राठोडवर गोळीबार केला. सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या काही अंतरावरच ही गोळीबाराची घटना घडली आहे. संतोष पवार (Builder Santosh Pawar), देवा राठोड आणि रमेश राठोड यांच्यासह इतर काहीजण सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रोडवरील योगीराज अ‍ॅटो सेंटरमध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी देवा राठोड यांनी त्यांच्याकडे असलेल्या एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर संतोष पवार यांच्याबद्दल एक पोस्ट टाकली. त्यावरून संतोष पवार आणि देवा राठोड यांच्यात बाचाबाची झाली. दोघांच्या भांडणात रमेश राठोड हे मध्ये पडले. त्यावेळी संतोष पवारने त्याच्या कमरेला असलेले पिस्तुल काढून रमेश राठोड यांच्या दिशेने फायर केले. रमेश राठोड यांच्या पायाला गोळी लागली. जखमी राठोड यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Pune Crime News)

गोळीबाराची घटना घडल्याचे समजताच सिंहगड रस्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे
(ACP Rajendra Galande), सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संख्ये
(Sr PI Shailesh Sankhe), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) आणि
इतर अधिकारी व कर्मचार्‍यांची घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी गोळीबार करणार्‍या संतोष पवारला ताब्यात घेतले आहे.
पवार याच्याकडे परवाना असलेले पिस्तुल असून त्याच्या संरक्षणासाठी एक पोलिस कर्मचारी देखील आहे.
पोलिस संरक्षणात असलेल्या बिल्डर संतोष पवारनेच गोळीबार करून एकाला जखमी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

Web Title :- Pune Crime News | One shot by Santosh Pawar, a builder under police protection; Incident on Suncity Road in Sinhagad Road area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?