Pune Crime News | अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 5 जणांना पर्वती पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | नातेवाईकांना त्रास देत असल्याच्या संशयावरुन पाच जणांनी एका अल्पवयीन मुलावर (Attack On Minor) हल्ला करुन खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याची घटना पानमळा सिंहगड रोड (Sinhagad Road) येथे घडली होती. ही घटना (Pune Crime News) शनिवारी (दि.5) रात्री दहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Pune Police) पाच जणांना पुणे सातारा रोडवरील (Pune Satara Road) लक्ष्मीनारायण टॉकीज (Laxminarayan Talkies) शेजारील उड्डाण पुलाखालून अटक (Arrest) केली आहे.

अरुण रोहिदास चंदनशिवे Arun Rohidas Chandanashive (वय-47 रा. धायरी, पुणे), अशोक रोहिदास चंदनशिवे Ashok Rohidas Chandanashive (वय-48 रा. धायरी), विकी कुमार चंदनशिवे उर्फ राज Vicky Kumar Chandanshive alias Raj (वय-32 रा. बेनकरवस्ती, धायरी), कुणाल कुष्णा सावंत
Kunal Kurshna Sawant (वय-24 रा. नऱ्हे, पुणे), प्रसिक उर्फ रणजित उत्तम कांबळे Prasik alias Ranjit Uttam Kamble (वय-32 रा. पानमळा, सिंहगड रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अल्पवयीन मुलाने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 307, 326, 143, 147, 148, 149, 506 आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी लक्ष्मीनारायण टॉकीज शेजारील उड्डाण पुलाखालील पार्किंग मध्ये असून ते पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस अंमलदार कुंदन शिंदे (Kundan Shinde), सद्दाम शेख (Saddam Shaikh), प्रकाश मरगजे (Prakash Margje) यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

फिर्यादी याच्या मामाचा 10 वर्षापूर्वी खून (Murder) झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी अशोक व अरुण चंदनशिवे यांची सहा वर्षापूर्वी निर्दोष सुटका झाली होती. याचा राग मनात धरुन अल्पवयीन मुलगा नातेवाईकांना त्रास देत असल्याचा संशय आरोपींना होता. याच रागातून आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोण सामील आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे (PSI Sunil Jagdale) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 सुहैल शर्मा (IPS Suhail Sharma), सिंहगड विभाग (Sinhagad Road Division)
सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे
(Sr PI Jayaram Paygude), पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomne) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक सुनिल जगदाळे (PSI Sunil Jagdale), पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे,
सद्दाम शेख, दयानंद तेलंगे-पाटील, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, प्रशांत शिंदे, अनिस तांबोळी, पुरुषोत्तम गुन्ला,
किशोर वळे, अमित चिव्हे व अमोल दबडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न करणार्‍या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar | जयंत पाटलांनी अमित शहांची भेट घेतली? अजित पवारांचा मोठा खुलासा; म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | ‘देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच…’ बानकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Political News | ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’, उद्धव ठाकरेंच्या टिकेला भाजपचे ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर