Maharashtra Political News | ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’, उद्धव ठाकरेंच्या टिकेला भाजपचे ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Political News | ठाकरे गटाचे (Thackeray group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अख्खा भाजप (BJP) जरी उभा राहिला तरी मला हरवू शकत नाही. ठाकरे नावाला इतिहास आहे, माझ्यावर टीका करणाऱ्यांना कोणता इतिहास आहे, असा सवाल त्यांनी केला. मी फक्त भाजपला सोडले आहे हिंदुत्व (Hindutva) नाही. भाजपमध्ये राम नाही, आहेत ते कवेळ आयराम. त्या आयारामांना घेऊन सत्ता स्थापन केली जात आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे कोण आला आणि कोण गेलं, हे लिहण्याचे मस्टर आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपवर (Maharashtra Political News) टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरेंच्या टीकेला आता भाजपने ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’ असा खोचक सवाल शेलार यांनी विचारला आहे. तुम्ही मुंबईवर 25 वर्ष राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?, आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे. तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका, असं म्हणत शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (Maharashtra Political News)

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणाले, अफजलखान (Afzal Khan), औरंगजेब (Aurangzeb) याच्या उचक्या ज्यांना रोज लागतात त्यांना आजच्या भाषणात इंग्रजांची उचकी लागली होती!
म्हणे इंग्रजांनी मुंबईचा विकास केला, भाजपाने मुंबईसाठी काय केले?
आज मैत्री दिन आहे, मग हेच जरा तुमचे जीवश्चकंठश्च असलेल्या काँग्रेसला (Congress) विचाराना…
त्यांनी साठ वर्षात काय केले? तुम्ही मुंबईवर 25 वर्षे राज्य केलेत तुम्ही काय केलेत ते सांगा?
आम्ही काय करतोय आणि केले हे मुंबईकरांना माहिती आहे…त्यांना सगळा हिशोब देऊच!
तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?
तुमचा कारभार रोज उघडा पडतोय तो आधी झाका!! असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maha Arogya Camp In Pune | महाआरोग्य शिबिराचा समारोप !
गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा – देवेंद्र फडणवीस

7 August Rashifal : या पाच राशीवाल्यांसाठी आठवड्याचा पहिला दिवस शुभ, वाचा दैनिक भविष्य