Chandrashekhar Bawankule | ‘देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत, त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच…’ बानकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrashekhar Bawankule | रविवारी (दि.6) मुंबईतील रंगशारदा सभागृहात ठाकरे गट (Thackeray Group) आणि संभाजी ब्रिगेडचा (Sambhaji Brigade) संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला होता. देवेंद्र फडणवीस ‘मस्टर मंत्री’च राहणार की काय? ते फक्त कोण आलं याची नोंद ठेवणार? असा टोला ठाकरेंनी लगावला होता. त्यांच्या या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

सरकारमध्ये किती उपमुख्यमंत्री (DyCM) नेमणार आहात? म्हणजे आधी एक पक्ष चोरला, नंतर दुसरा पक्ष चोरला. आता कुणीतर सांगत होतं, काँग्रेसही (Congress) फोडणार आहेत. त्यामुळे राज्यात किती उपमुख्यमंत्री होणार आहेत? आणि देवेंद्र फडणवीस फक्त ‘मस्टर मंत्री’ राहणार की काय? ते फक्त वही घेऊन कोण आला? याची नोंद ठेवणार का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.

चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ज्यांना वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही ते उद्धव ठाकरे म्हणत आहेत की, भाजपमध्ये (BJP) राम उरला नाही. तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्व (Hindutva) गुंडाळून ठेवले. आता प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्हाला आठवण येत आहे. राम मंदिराचं भूमीपूजन (Ayodhya Ram Mandir) झालं तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारनं राज्यभर गुन्हे (FIR) दाखल केले होते हे तुम्ही विसरलात की काय?

देवेंद्रजी मस्टर मंत्री नाही तर…

तुम्ही बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) शिवसेना (Shivsena) काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती.
जी प्रामाणिक शिवसैनिकानं मुक्त केली आणि बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा अभिमानाने महाराष्ट्रावर फडकला.
नरेंद्र मोदींवरजींवर टीका करण्याची तुमची लायकी नाही हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे आणि देवेंद्रजी मस्टर मंत्री
नाही तर मास्टर आहेत. त्यांच्या मास्टरस्ट्रोकमुळेच तुम्हाला घरी बसावं लागलं.

औरंग्याच्या सत्तेला जसा….

औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसलं आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलंय. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला. तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला.
2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल.
तोवर तुम्ही औरंग्या, अफझल खान आणि इंग्रजांचा उदो उदो करत बसा कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय,
अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | ‘तुम्हाला सांगायला तुम्ही आमचे कोण? मामा की काका?’, उद्धव ठाकरेंच्या टिकेला भाजपचे ‘धनंजय माने स्टाईल’ प्रत्युत्तर

Pune Crime News | 25 लाखांच्या व्यवहारावरुन ओला-उबेर चालकाचे अपहरण; सांगलीहून सुटका, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक