Pune Crime News | कोंढव्यात दहशत माजविणार्‍या अट्टल गुन्हेगारावर MPDA, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची आतापर्यंतची 27 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कोंढवा पोलिस स्टेशनच्या (Kondhwa Police Station) हद्दीत दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) कारवाई केली असून त्यास वर्षभराकरिता स्थानबध्द करण्यात आले आहे. (Pune Crime News)

शाहबाज उर्फ लंबु इलियाज खान Shahbaz alias Lambu Ilyaz Khan (21, रा. सर्व्हे नं. 5, आश्रफनगर, लेन नं. 7, अल्लाहु अकबर बिल्डींग, फ्लॅट नं. 202, कोंढवा) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शाहबाज खानने त्याच्या साथीदारांसह कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी रॉड, धारदार हत्याराने खुनाचा प्रयत्न, विनयभाग, जबरी चोरी, दंगा करणे, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक त्याच्याविरूध्द उघडपणे तक्रार करत नव्हते. (Pune Crime News)

त्यापार्श्वभुमीवर कोंंढवा पोलिसांनी त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई होण्याकामी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली असून शाहबाज खान याच्याविरूध्द कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 27 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केलेली आहे.

आरोपीस स्थानबध्द करण्यामध्ये कोंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे (Sr PI Santosh Sonawane) आणि गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) पीसीबीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Sr PI Vaishali Chandgude) यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

Web Title :  Pune Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s 27th MPDA Action On Criminals

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Crime | पुणे जिल्ह्यात खळबळ ! सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवकाची जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने हत्या

Pune Police News | फरासखाना पोलिसांकडून मोक्कातील फरार आरोपीला अटक; पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून पोलिस अंमलदाराचा सत्कार

Speaker Rahul Narvekar | 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयाला लागला वेग; विधानसभा अध्यक्ष आजच नोटीस देण्याची शक्यता

NCP Chief Sharad Pawar | “राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम”; पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचा दावा

Pune Crime News | पुणे : ट्रेकला गेलेला तरुण पाण्यात गेला वाहून; मावळमधील कुंडमळ्यातील धक्कादायक घटना

Dr. Pradeep Kurulkar | प्रदीप कुरुलकरांची पाकिस्तानी गुप्तहेराबरोबर क्षेपणास्त्रांविषयी चर्चा; एटीएसच्या दोषारोपपत्रात धक्कादायक उल्लेख

Pune Crime News | पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 26 वी MPDA ची कारवाई ! विमाननगर परिसरात दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध